वेध माझा ऑनलाइन /अजिंक्य गोवेकर
कराड
सध्याच्या कोविड संकटात सातारा जिल्ह्यातील रुग्णसंख्येच्या वाढीचे राज्यात रेकॉर्ड झाले असताना दुसरीकडे कराडच्या नागरी आरोग्य केंद्राच्या भम्पक कारभाराचे चित्र शहरासमोर आले आहे याबाबत लोकांच्या तक्रारीही वाढल्या आहेत.त्याचीच शहरात सध्या चर्चा आहे...
सातारा जिल्ह्यातील कोविड रुग्णसंख्या कमी होण्याची चिन्हे अजूनतरी दिसत नाहीत यासाठी फक्त लोकांनाच जबाबदार धरले जाते आणि त्याची अमलबजावणी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात... मात्र जखम मांडीला आणि औषध ...शेंडीला... असा काहीसा हा प्रकार होत आहे का ? हे देखील पाहण्याची आता गरज आहे...
कराडच्या अनेक भागामध्ये आयसोलेट पेशंट आहेत त्याठिकाणी या रुग्णांना एकदा आयसोलेट केले की पुन्हा त्यांची साधी चौकशीही या केंद्राच्या डॉक्टर्स कडून होताना दिसत नाही...त्यांना घरी उपचारासाठी दिले जाणारे ट्रीटमेंट किट देखील दिले जात नाही अशा तक्रारी येत आहेत... त्यांपैकी काहीना चक्क एक फॉर्म भरून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असल्याचे दाखवले गेले असल्याची चर्चा आहे..हे कशासाठी.? याचे उत्तर अद्याप मिळालेलं नाही..जे रुग्ण पॉझिटिव्ह आहेत त्यां अनेकांच्या घराबाहेर कोविड पीसीटीव्ह चा बोर्ड आता का लावला जात नाही ? हा आता नव्याने प्रश्न आहेच...अनेक रुग्ण स्वतः एच आर सी टी करण्याकरिता बाहेर पडत आहेत...कारण या लोकांना चेकिंग ला जाण्यासाठी पालिकेकडून अम्ब्युलन्स मिळत नाही अशी या लोकांची तक्रार आहे... डॉक्टर्स त्यांच्याकडे फिरकतही नाहीत... विशेष म्हणजे मध्ये पालिकेकडे डॉक्टर्स उपलब्ध नव्हते म्हणून प्रशासन काही विचारले तर डॉक्टर्स उपलब्ध नसल्याची कारणे सांगत होते... आता 3 डॉक्टर्स उपलब्ध असतानादेखील घरोघरी जाऊन चक्क आशा वर्कर्स रुग्णांची तपासणी करताना दिसत आहेत...मग हे डॉक्टर्स करतात काय...? कसला कारभार चाललय हा...? प्रॉपर जबाबदाऱ्या का पेलल्या जात नाहीत ? हे वैद्यकीय काम आशा वर्कर्स लोकांचे आहे का? जिल्ह्यातील कोरोना फक्त लोकांच्या हलगर्जीपणामुळे वाढतो असे बोलताना या आरोग्य केंद्राचा असला कारभारालादेखील तितकाच जबाबदार धरायला नको का ? लोकांना हा कारभार कसा चालू आहे हे त्याशिवाय कळणार तरी कसे ? अशीही चर्चा आहे
याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी पालिकेचे सी ओ डाके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उपलब्ध तीन डॉक्टर्स पैकी एक येतच नाही...असे सांगितले...तर उरलेले दोन त्यांच्या वेगवेगळ्या वैद्यकीय जबाबदारीच्या कामात असतात असेही ते म्हणाले...अधिक माहितीसाठी याबाबत डॉ कुलकर्णी मॅडम यांच्याशी संपर्क करा म्हणजे बरे पडेल... असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला...त्यांचा नंबर देऊ का ? असेही आपुलकीने विचारले... मात्र सी ओ म्हणून जबाबदारीने कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देणे त्यांनी टाळले...
याविषयी बोलताना डॉ कुलकर्णी यांनी कोरोना पेशंटला एच आर सी टी करण्याकरिता स्वतः बाहेर पडावे लागते हे खूप धोकादायक आहे असे कबूल केले...त्या रुग्णाला पालिकेकडून रुग्णवाहिका मिळत नाही त्यामुळे या रुग्णांना चेकिंगसाठी स्वतः ला बाहेर पडावे लागत असल्याने कोरोनाचा प्रसार होण्यास मदत होते का..? आत्तापर्यंत अशा चूका झाल्यामुळे पेशंटच्या संख्येत वाढ झाली असेल... तर याला जबाबदार कोण ? या प्रश्नावर मात्र त्या गप्प बसल्या..
इतर विचारलेल्या प्रश्नबाबतीत सी ओ शी बोलून घेते असे म्हणून त्यांनी वेळ मारून नेली... मुख्याधिकारी डॉ कुलकर्णीशी बोलून घ्या म्हणतात...डॉ कुलकर्णी सी ओ शी बोलून घेते अस म्हणतात... या दोन्ही अधिकाऱ्यांकडून आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून प्रत्येकवेळी अशीच वेळ मारून नेली जाते... अशी नेहमी चर्चा असते...
कोविड मुळे शहर व परिसरातील लोकांची अवस्था बिकट असताना अशा प्रकारच्या उडवाउडवीच्या कारभाराची अपेक्षा अजिबात नाहीये...मात्र कारभार यापुढेही असाच होणार असेल तर रुग्णसंख्येच्या बाबतीत कराडचा नंबर मागे कसा राहील ?त्यासाठी लोकांच्या विनाकारण फिरण्याला जसे जबाबदार धरले जाते तसेच काही अंशी या नागरी आरोग्य केंद्राच्या भम्पक कारभारालादेखील जबाबदार धरायला नको का ? अशीही आता चर्चा सुरू झाली आहे...
No comments:
Post a Comment