Sunday, May 2, 2021

कराड पालिकेचे गटनेते राजेंद्रसिह यादव "कोरोना पॉझिटिव्ह'; सर्वांनी काळजी घ्या - गटनेत्यांचे आवाहन...

कराड 
कराड शहरातील नागरिकांची सेवा करताना विविध लोकांचा संपर्क आला दरम्यान कोरोना चाचणी करून घेतली असता कोरोना बाधित झालो आहे. यातून मी लवकर बरा होऊन पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईल अशी माहिती जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. 

माझ्यावर निरातिशय प्रेम करणार्‍या कराडकर नागरीकांनी माझ्या प्रकृती विषयी सातत्याने विचारणा करुन माझी अत्यंत काळजीने विचारपूस केली या सर्व सह्रदयींसाठी मी मनोभावे वस्तुस्थिती मांडतो आहे. कोरोना महामारीची झळ कराडकरांना लागू नये, यासाठी गेली वर्षभर मी नगरपरिषद, शाहीर आत्माराम यादव प्रतिष्ठान या माध्यमातुन गरजुंसाठी धान्य वाटप, भाजीपाला वाटप, सॅनिटायझर, मास्कचे वाटप, लसीकरण आणि कराड शहरातील वेगवेगळ्या गल्ली - मोहल्ल्यात तसेच झोपडपट्यांमधे स्वखर्चाने केलेली औषध फवारणी अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून सातत्याने समाजात वावरत असल्यामुळे नुकताच मी कोरोना पाॅझिटीव्ह झालो आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी योग्य ती वैद्यकीय चाचणी करुन स्व:ताची काळजी घ्यावी. माझ्यावर योग्य ते उपचार सुरु आहेत. लवकरच मी यातून बरा होऊन कोरोना महामारीच्या या संकटात कराडकरांच्या मदतीसाठी हजर होईन.

No comments:

Post a Comment