Sunday, May 16, 2021

भाजप खासदाराला ‘राष्ट्रवादी’ मय शुभेच्छा ! अनेकांच्या भुवया वर...

वेध माझा ऑनलाइन 
 राज्यातील आघाडी सरकार  व विरोधी भाजपत सध्या विस्तवही जात नसताना भाजप खासदारांच्या वाढदिवस शुभेच्छाफलकांवर राष्ट्रवादीतील नेत्यांची छायाचित्रे लागल्याने राजकीय चर्चेस उधाण आले आहे. माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे  यांनी रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांचे अभीष्टचिंतन करणाऱ्या पोस्ट व्हायरल झाल्याने आश्‍चर्यही व्यक्त होतेय.

भाजपच्या रावेर येथील खासदार रक्षा खडसे यांचा गुरुवारी वाढदिवस झाला. त्यांचे अभीष्टचिंतन करणाऱ्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. या सर्व पोस्टमध्ये लक्षवेधी ठरल्या त्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड रोहिणी खडसे...

 रक्षा खडसे रावेरच्या भाजपच्या खासदार असल्या तरी त्या एकनाथ खडसेंच्या स्नुषा आहेत. खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करताना त्यांची कन्या तथा जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी यांना बरोबर घेऊन राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले. रक्षा खडसे यांनी मात्र भाजपत राहणे पसंत केले. 

एकाच कुटुंबात दोन पक्षांचे लोक, ही राज्याला अथवा देशासाठी नवीन बाब नाही. त्यामुळे खडसे राष्ट्रवादीत व स्नुषा भाजप याला काही राजकीय आचारसंहिता लागू नाही. आपल्याच कुटुंबातील पण, अन्य पक्षातील सदस्याला शुभेच्छा देणेही स्वाभाविक. एरवी भिन्न पक्षात असतानाही अनेक नेत्यांच्या मैत्री व संबंधांचे आजही दाखले दिले जातात त्यामुळे भिन्न पक्षातील लोकप्रतिनिधीला शुभेच्छा देण्यालाही कुठली आचारसंहिता आडवी येण्याची गरज नाही. मात्र, रक्षा यांना शुभेच्छा देताना खडसेंच्या  कन्या ॲड. रोहिणी यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हासह खडसेंचा व शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, ॲड. रवींद्र पाटील या राष्ट्रवादीच्या नेत्यांची छायाचित्रे आवर्जून वापरली आहेत आणि याचेच असचर्य सध्या सगळीकडे चर्चेत आहे..

No comments:

Post a Comment