Thursday, May 13, 2021

शिवजयंतीनिमित्त हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने कोरोना रुग्णांना व लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना एनर्जी ड्रिंक आणि फळ वाटप...



वेध माझा ऑनलाइन
कराड
आज शिवजयंती निमित्त येथील हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने येथील कॉटेज हॉस्पिटल आणि एरम हॉस्पिटल येथे कोरोना रुग्णांना फळ वाटप व केंद्राबाहेर लसिकरनासाठी थांबलेल्या नागरिकांना (ORS ) एनर्जी ड्रिंक वाटप करण्यात आले अशी माहिती हिंदू एकताचे जिल्हा संपर्क प्रमुख अजय पावसकर यांनी दिली आहे.

यावेळी हिंदू एकताचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगरसेवक विनायक (अण्णा) पावसकर सातारा जिल्हा संपर्क प्रमुख अजय पावसकर,कलबुर्गी काका, जिरंगे नाना, हिंदू एकता कराड शहराध्यक्ष प्रकाश जाधव, हिंदू एकता जिल्हा उपाध्यक्ष रुपेश मुळे ,हिंदू एकता कार्याध्यक्ष.राहुल यादव ,मलकापूर शहराध्यक्ष .दिग्विजय मोरे, .राऊत काका,.खुटाळे काका  .संतोष काळे, गणेश महामुनी प्रसाद पंडित, धीरज देवाडीका.देविदास शानबाग .कुमार घोंगडी .सुनील कुलकर्णी .उमेश साळुंखे आदी उपस्थित होते

हिंदू एकता व भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी मागील लॉक डाऊन काळात त्यांनी मोठं काम केलं आहे. गरजुना अत्यावश्यक मदत करण्यासह मजुरांच्या स्थलांतरणाचा प्रश्न त्यांनी सोडवला आहे  टेम्परेचर व ऑक्सिजन टेस्टिंगसहित कोरोना पेशंटच्या गरजेनुसार ऑक्सिजन मशीनची उपलब्धताही त्यांच्या मित्रपरिवाराच्यावतीने कोरोना काळात करण्यात आली सगळी हॉस्पिटल्स पेशंट्सनी फुल्ल असताना घरातच अनेकजण उपचार घेत होते,अशा पेशंटसची संख्यादेखील काही हजारात होती,तेव्हा व्हेंटिलेटरविना पेशंट दगावत होते.रुग्ण दगावण्याचा रेशीओ वाढला होता.अशावेळी विक्रम पावसकर मित्र परिवार लोकांसाठी धावून आला.त्यांच्या वतीने येथील टिळक हायस्कुल येथे 25 बेड चे कोविड सेंटर उभे राहले व त्या ठिकाणी सर्वसामान्य रुग्णांना उपचार मोफत मिळाले. त्यानी आज शिवजयंतीनिमित्त राबवलेल्या उपक्रमाचेही कौतुक होतय.

No comments:

Post a Comment