Sunday, May 23, 2021

जाहिरातबाजी न करता लोकांना मदत करण्याची गरज...सध्याच्या कोविड संकटात लोकप्रतिनिधींकडून कराडकरांची अपेक्षा...


वेध माझा ऑनलाइन
कराड
सातारा जिल्हा कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत राज्यात चर्चेत आहे कराड शहर व तालुक्याची रुग्णसंख्या देखील कमी होत नसल्याचे चित्र आहे आता येथील नेते मंडळींनी पुढे होऊन याबाबत काम करण्याची वेळ आली आहे. त्यापैकी काहीजण काम करताना दिसत आहेत मात्र जे घरात बसून आहेत त्यांच्यावर लोकांचे लक्ष आहे या पुढारी म्हणवणार्यानी आता या संकटात बाहेर पडून ठोस कार्य करण्याची गरज आहे त्यासाठी महत्वाची आहे या संकटात लोकांसाठी काम करण्याची इच्छाशक्ती...

माजी नगरसेवक आणि विद्यमान भाजपा चे  सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी मागील कोविड संकटकाळात 25 बेड चे कोविड सेंटर सुरू करून गरिबांना मोफत उपचार दिले होते सध्या भाजपा चे राज्यात सरकार नाहीये त्यामुळे त्यांना सर्व सुविधा स्वतःच्या ताकदीवर कराव्या लागल्या आणि त्यांनी त्या केल्या देखील राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके, भाजपा आमदार महेश शिंदे यांचीही याबाबतीत अशी उदाहरणे देता येतील यांनी पदरमोड करून रस्त्यावर उतरून लोकांसाठी या कोविड काळात झोकून काम केल्याचे सम्पूर्ण राज्याला माहीत आहे...सध्याच्या या कोविड संकटकाळात दुसरी लाट हाहाकार माजवत असताना मात्र कराड शहर व परिसरातील काहीजण सोडले तर इतर पुढारी म्हणवणारे शहरातील नगरसेवक  किंवा तालुक्यातील नेते लोकांसाठी काम करण्याचे धाडस करताना का दिसत नाहीत ? हा प्रश्न लोकांना आहेच...प्रत्यक्ष काम न करता केवळ आम्ही काहीतरी करतोय हे दाखवण्यावर अनेकांचा भर मात्र दिसतोय... त्याची जाहिरातबाजी होताना दिसतेय...प्रत्यक्ष काम करताना मात्र काही मोजकेच लोक जे राजकारणात नाहीत असे योध्ये दिसत आहेत... मग राजकारणी लोक फक्त मते मागायला आणि केवळ जाहिरातबाजी करायलाच पुढे येणार का?एखादे कोविड सेंटर किंवा इतर सुविधा का राबवू शकत नाहीत ?तर याना फक्त लोकांसाठी काहीतरी आम्ही करतोय एवढं दाखवायचय प्रत्यक्ष काहीच करायचं नाहीये हे आता लोकांना समजू लागलंय...दुसरीकडे लोकडाऊन आहे तरी पेशंट कमी होत नसल्याचे चित्र आहे त्यामुळे प्रशासनाने संबंधित तज्ञांशी चर्चा करून काहीतरी दुसरी उपाययोजना करणेही त्याचबरोबर गरजेचे आहे कारण या लॉक डाऊन ने लोकांवर उपासमारीची वेळ आल्याचे चित्र निर्माण होऊ लागलय याचाही विचार होणे गरजेचे आहे...

सध्याचा काळ हा कोविड संकटाचा पीक पिरियड आहे असे डॉक्टर्स सांगत आहेत मागेदेखील असाच काळ लोकांनी अनुभवला अशावेळी लोकांची अपेक्षा असते की आपल्या दारात मते मागायला जे लोक येतात त्यांनी आता घरात न बसता जनतेच्या सर्वतोपरी मदतीला यावं...राज्यात अनेक ठिकाणी असे राजकारणी रस्त्यावर उतरलेही आहेत...लोकांना सगळी मदत करत आहेत... मात्र कराडात काहीजण सोडले तर प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून लोकांसाठी कोणी काही करताना दिसत नाहीयेत...फक्त मी बेड मिळवून दिला एवढंच काम आणि त्याची पब्लिसिटी त्याहीपेक्षा मोठी असे चित्र सध्या दिसतय आणि मोबाईल च्या माध्यमातून फक्त या लोकांची जाहिरातबाजी सुरू आहे... आम्ही लोकांसाठी काहीतरी करतोय एवढंच दाखवत त्यातही राजकारणाचा वास यावा हाच हेतू दिसतोय लोकांना मात्र हे अपेक्षेत नाही...
मागील कोविड संकटात येथील भाजपा चे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी 25 बेड चे कोविड सेंटर यशस्वी चालवून अनेक गोरगरिबांना या आजारातून मुक्त करण्यात वाटा उचलला राज्यात सत्ता नसल्याने शासनाने त्यांना कोणतीही मदत पुरवली नाही तरी त्यांनी स्वतःच्या ताकदिवर हे धनुष्य पेललं असे आणखी काहीजण नेते आहेत त्यापैकी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके असतील कोरेगावचे आमदार महेश शिंदे असतील,खुपजण या अडचणीच्या वेळी लोकांप्रति आपलं कर्तव्य समजून घराबाहेर पडून लोकांसाठी रस्त्यावर उतरले आहेत  मात्र इथले काहीजण पुढारी म्हणवणारे कराडात अद्याप का काहीच करू शकले नाहीत? काहीजण तर घरातून देखील बाहेर दिसत नाहीत...सत्ताधारी असोत किंवा विरोधक असोत यापैकी कराडात कोणी लोकांसाठी ठोस असे का केले नाही...असा लोकांना प्रश्न आहे... पैसे भरून कोविड सेंटर उभी आहेत त्याचा उपयोग गरिबाला होत नाही...येथील कॉटेज हॉस्पिटलमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून स्कॅनिंग मशीन धूळ खात पडलेय त्याची दुरुस्ती करूनही त्याचा अद्याप गरिबाला उपयोग होत नाही... त्याठिकाणी कोणी तज्ञ डॉक्टर नाही..सुविधांची बोंब... असे असताना त्याबाबत कोणी पुढारि काही करताना दिसत नाही... मात्र सध्या गरज नसलेली उचापत शहरातूंन चालू आहे  म्हणजेच  आताच्या घडीला लोकांना महत्वाची गरज खासदार फँडातूंन होणाऱ्या "रस्त्याची' आहे की कोविड रुग्णसेवेची ? मग हे गरज नसताना का चाललंय आणि कशासाठी..?  कोविड रुग्णसेवेचे सध्याच्या संकटात काय काम करता येईल का? याचा विचार या रस्त्याच्या कामापेक्षा मोठा नाही का? मग लोकसभा नेतृत्व म्हणून तो का केला गेला नाही ? असा सवाल लोक विचारत आहेत...दुसरीकडे महिना होऊन गेला अद्याप लॉक डाऊन आहे आणि रुग्णसंख्या म्हणावी त्या प्रमाणात कमीही होत नाहीये म्हणून प्रशासनाने तज्ञांशी सल्लामसलत करुन याबाबत दुसरी उपाययोजना करणे अपेक्षित आहे  तरीपण  उद्योग धंदे बंद असल्याने काही घटकांवर उपासमारीची वेळ आल्याचे दिसतंय मागील संकटात अनेकांनी या लोकांना वेगवेगळी मदत केली तसेच याही वेळी या घटकांना मदत करण्याकरिता उपाययोजना झाल्या पाहिजेत...अनेकठिकानी लहान मुले व वृद्धांचे अक्षरशः खूप हाल सुरू आहेत...

दरम्यान,कृष्णा हॉस्पिटल,सह्याद्री,अशी हॉस्पिटल्स आपलं योगदान देत आहेत मात्र राजकारण्यांनी आपली उंची वापरून लोकांसाठी जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी पाऊल आता उचलले पाहिजे घरातून बाहेर पडले पाहिजे काहिठिकानी बेड मिळत नाहीत,काही ठिकाणी त्यासंबंधीची ट्रीटमेंटची वानवा आहे या सगळ्यावर मात देण्यासाठी स्वतःला वेळप्रसंगी पैशाची चाट लावून घेऊन किंवा इतर स्पॉन्सर मिळवून पुढारी म्हणवणाऱ्यांनी मग ते कोणत्याही पार्टीचे असोत,त्यांनी कराड व परिसराला कोरोनामुक्त करण्यासाठी कम्बर कसली पाहिजे त्यासाठी हे नाही... ते  नाही...अशी सोंग अजिबात नकोत...राजकारण सोडून या अडचणीच्या वेळी आपण लोकांसाठी खरंच काहीतरी ठोस केलं पाहिजे अशी मनापासूनच्या इच्छाशक्तीची गरज आहे... सत्ता असो... नसो...आपण यांच्या दारात मते मागायला जातो,आता याच लोकांना मदत केली पाहिजे अशी भावना या पुढारी म्हणवणार्याच्यात असली पाहिजे केवळ पेपरमध्ये जाहिरातबाजी करून आम्ही  लोकांसाठी काय करतोय हे दाखवून आता लोक फसणार नाहीत...लोकांना तुम्ही रस्त्यावर उतरून काम केलेले पहायचय... आणि,तरच लोक तुम्हाला शहरात मानतील... नाहीतर फक्त कार्यकर्तेच तुम्हाला मानतील व जनता योग्यवेळी योग्य उत्तर देईल हे लक्षात असू द्या अशी जनतेची भावना झाली आहे..आणि शहराची निवडणूक काही महिन्यावरच आली आहे...!!

No comments:

Post a Comment