सातारा
10 मे 2021 पासून सातारा जिल्ह्यातील खालील ठिकाणी 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी कोविड लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. सदर सत्रे ही फक्त 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठीच असून ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करुन अपॉइनमेन्ट घेणे बंधनकारक आहे. नोंदणीसाठी उद्या दि. 10 मे 2021 पासून रोजी सकाळी 11 www.cowin.gov.in किंवा https://selfregistration.cowin.gov.in या संकेत स्थळावर आपली अपॉइनमेन्ट निश्चित करता येईल. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.
सातारा जिल्ह्यातील खालील प्रमाणे कोविड लसीकरण सत्राची ठिकाणे : कराड येथील उपजिल्हा रुग्णालय, कोरेगांव येथील ग्रामीण रुग्णालय,खटाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र,पाटण येथील ग्रामीण रुग्णालय,फलटण येथील उपजिल्हा रुग्णालय,महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालय, माण येथील ग्रामीण रुग्णालय,दहिवडी. मेढा येथील ग्रामीण रुग्णालय,वाई येथील ग्रामीण रुग्णालय,खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र,शिरवळ. व सातारा येथील जिल्हा रुग्णालय,सातारा.असे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सातारा यांनी कळविले आहे.
0000
Sir,amhi gele 10 diwas dhadpadtoy,rojsagale booked yetoy. Karad SDH .Pudhache tareekh pan milat naahi. Kripaya margdarshan karave.Dhanyawad.🙏
ReplyDeletewww.under45.in site var Jaun telegram alert set Kara. Kolhapur madhe milat aahe. Alert aala ki 2min madhe registration Kara. Paytm Varun pan alert Sathi registration Karu shakta.
Delete