Saturday, May 24, 2025

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात ; पोलिसांनी पत्रकार परिषद 1 मिनिट, 10 सेकंदात आटोपली ;

वेध माझा ऑनलाइन। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. हगवणे कुटुंबाच्या विरोधात त्यांच्या सुनांकडून वेळोवेळी आलेल्या तक्रारींची दखल पोलिसांनी घेतली नाही. वैष्णवीच्या बाळाचं अपहरण झाल्यानंतरही पोलिसांनी अक्षम्य हलगर्जीपणा दाखवला. त्यामुळे पोलिसांनी एकप्रकारे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या हगवणे कुटुंबीयांनीच पाठीशी घातल्याचा आरोप होतोय. आता कामात हयगय करणाऱ्या पोलिसांवर सरकार कारवाई करणार का, असा प्रश्न विचारला जातोय.

वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणेला अटक झाली. यानंतर पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. पण ती केवळ १ मिनिटं १० सेकंदात आटोपली. एवढ्या संवेदनशील विषयावर बोलण्यासाठी सव्वा मिनिटही न देणारे पुणे पोलीस टीकेचे धनी बनलेत. मुळातच वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका वादाच्या भोवऱ्यात सापडली. वैष्णवीचा जीव घेणाऱ्या हगवणे कुटुंबीयांनी मोठी सून मयुरीचाही अतोनात छळ केला होता. मयुरीनं नोव्हेंबर २०२४ मध्ये मारहाणीची पौड पोलीस ठाण्यात तक्रार केली.  गुन्हा दाखल होऊनही पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावींनी कारवाई केली नाही. मयुरीच्या मारहाणीपासून वैष्णवीच्या आत्महत्येपर्यंत पुणे पोलिसांनी पावलापावलाला हलगर्जीपणा केलाय. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे वैष्णवीचं नऊ महिन्यांचं बाळाची सहा दिवस आबाळ झाली.
 

No comments:

Post a Comment