वेध माझा ऑनलाइन।
राज्याच्या मंत्रिमंडळात नव्याने मंत्री झालेल्या छगन भुजबळांनी एक मोठं वक्तव्य केलं. धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागल्याने त्या ठिकाणी भुजबळांची वर्णी लागली अशी चर्चा सुरू आहे. पुढे जर धनंजय मुंडे यांना क्लीनचिट मिळाली तर मी राजीनामा देईन असं छगन भुजबळ म्हणाले. काँग्रेस फुटली त्यावेळी मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर होती, पण मी शरद पवारांसोबत गेलो असंही छगन भुजबळ म्हणाले.
भविष्यात धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळालं तर भुजबळ काय करणार? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर छगन भुजबळ म्हणाले की, "उद्या जर धनंजय मुंडे यांना क्लीनचिट मिळाली तर आपण मंत्रिपदाचा राजीनामा देऊ. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घ्यायचं ठरलं तर माझी काही हरकत नाही. मी या मंत्रिमंडळात पुन्हा आलोय, सन्मानाने मला परत बोलवलं. धनंजय मुंडे सगळ्यातून मुक्त झाले, त्यांची सगळी लाईन क्लिअर झाली तर मी राजीनामा देईन."
मंत्रिपद देताना या गोष्टीवर चर्चा झाली होती का या प्रश्नावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, अशा पद्धतीची चर्चा होऊ अगर न होवो, राजीनाम्याचा निर्णय मीच घेणार.
No comments:
Post a Comment