वेध माझा ऑनलाइन।
राष्ट्रवादीच्या स्थापनेवेळी सर्वप्रथम शरद पवारांसोबत गेलेले पाटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर आणि त्यांचे सुपूत्र सत्यजितसिंह पाटणकर या महिनाअखेरीस भाजपावासी होणार आहेत. निकटवर्तीयांचा हा प्रवेश शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या प्रवेशामुळं पाटण तालुक्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होणार आहे काँग्रेसमधून बाहेर पडून शरद पवारांनी १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी सातारा जिल्ह्यातून सर्वप्रथम विक्रमसिंह पाटणकर हे पवारांबरोबर गेले होते. त्याही आधीपासून ते शरद पवारांचे विश्वासू होते. १९९९ साली सत्तेवर आलेल्या विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीतून विक्रमसिंह पाटणकरांना सार्वजनिक बांधकाम खात्याचं कॅबिनेट मंत्रिपद मिळालं होतं. राजकीय चढ उतारात पाटणकर घराणं कायम पवारांच्या पाठीशी राहिलं.
No comments:
Post a Comment