Friday, May 23, 2025

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा थेट वैष्णवीच्या वडिलांना फोन ; काय म्हणाले दादा?

वेध माझा ऑनलाइन
वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणावरुन राज्यभरात संताप व्यक्त होत असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी असल्यानेच राजेंद्र हगवणे यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला होता. वैष्णवीच्या वडिलांना आपली कैफियत मांडताना स्वत: अजित पवार वैष्णवीच्या लग्नाला उपस्थित होते, तेव्हा त्यांनी देखील फॉर्च्युनर कार पाहून खोचकपणे प्रश्न विचारल्याची माहिती दिली होती. तसेच, अजित पवारांच्याच हस्ते फॉर्च्युनरची चावी हगवणेंना दिल्याचे फोटोही समोर आले होते. त्यानंतर, मीडियात आणि समाजमाध्यमांतून अजित पवारांना देखील लक्ष्य करण्यात आलं होत. आता, अजित पवार यांनी एका भाषणात आपली भूमिका मांडली. तर, वैष्णवीच्या वडिलांना फोन करुन देखील मी तुमच्या पाठीशी आहे, वैष्णवीला न्याय मिळवून देणार असे आश्वासन दिले

No comments:

Post a Comment