Saturday, May 24, 2025

मंत्री गिरीश महाजन म्हणाले... देवेंद्र फडणवीसांनी मनात आणलं तर ते छगन भुजबळांना राज्याचा तिसरा उपमुख्यमंत्रीही करतील ...

वेध माझा ऑनलाइन
नाशिकच्या पालकमंत्रिपदावर कुणीही दावा करू शकतो, पण पालकमंत्री कुणाला करायचं हा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आहे असं राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मनात आणलं तर ते छगन भुजबळांना पालकमंत्री करतील, राज्याचा तिसरा उपमुख्यमंत्रीही करतील असं वक्तव्यही गिरीश महाजन यांनी केलं. त्यावर नंतर त्यांनी सारवासारवही केल्याचं दिसून आलं.

छगन भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर ते आता नाशिकच्या पालकमंत्रिपदावर दावा करणार असल्याची चर्चा आहे. यासंबंधी प्रश्न विचारल्यानंतर गिरीश महाजन म्हणाले की, "पालकमंत्रीपदावर कुणीही दावा करू शकतो. त्याला काहीच हरकत नाही. पण हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आहे. त्यांनी जर मनात आणलं तर भुजबळांना पालकमंत्री करतील. फडणवीस भुजबळांना राज्याचे तिसरे उपमुख्यमंत्रीही करू शकतील."


No comments:

Post a Comment