Saturday, May 24, 2025

मयुरी हगवणेंच्या आई आणि भावाचे राज्य महिला आयोगाला पत्र ; पत्रात म्हटलंय - मुलीच्या छातीला सासऱ्याने हात लावला ; आणखी वाचा काय म्हटलंय पत्रात -

वेध माझा ऑनलाइन।
 मयुरी हगवणेंच्या आई आणि भावाने राज्य महिला आयोगाला लिहिलेले सहा महिन्यापूर्वी एक पत्र पाठवले होते. या पत्रात हगवणे कुटुंबीयांकडून त्यांच्या मुलीवर होत असलेल्या अत्याचारांचा पाढा वाचला होता. माझी मुलगी सौ. मथुरी सुशील हरवणे हीचे 20 मे 2022 रोजी श्री. सुशील राजेंद हगवणे रा. भुकुम ता. मुळशी यांच्याशी विवाह झाला. त्यानंतर लग्नाच्या काही कालावधी नंतर तिचे सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे व सासू लता राजेंद्र हगवणे यांनी आम्हाला फ़ॉच्यूनर पाहिजे व पैसे पाहिजे, असा मोठ्या गाड्यांच्या व रोख रकमेची मागणी करूण तिला त्रास देऊ लागले. तुला, वडिलांना तुझ्या अपंग भावास व आईस आम्ही मारहाण करू. आमच्याकडे बंदुका आहेत. काही वाकड करू शकत नाही. माझा मेहुणा मोठा पोलीस अधिकारी आहे. आमच्या मागे मोठा राजकीय पाठींबा आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले होते

आम्ही पौंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी तेथील पोलिस अधिकाऱ्यांनी समाज देऊन मध्यस्थी केली. त्यानंतर सासू व सासऱ्यांनी तिच्या पतीकडे माझ्या मुलीला सोडण्याची वारंवार मागणी करू लागले. त्याच्या पतीचा या गोष्टीस नकार असल्याने त्याचा राग हा मुलीवर काढत होते.  दि. 06/11/2024 रोजी तिचे पती घरी नसताना सासू, सासरे, दीर व नणंद यांनी तिला मारहाण केली. तिचे कपडे फाडले. मुलीच्या छातीला सासऱ्याने हात लावला व दिराने मुलीच्या अवघड जागी लाथ मारली.  तुला मुलगा होत नाही तर आमच्या कडे ये या भाषेत मुलीला शिवीगाळ केला. हे सर्व होत असताना मुलीने मोबाइलमध्ये रेकॉर्डिंग चालू केले होते. हे कळताच तिचा दीर शशांक राजेंद्र हगवणे यांनी तिचा  मोबाईल हिसकावून पळ काढला, असेही या पत्रात म्हटले होते.

No comments:

Post a Comment