बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याला बीडच्या कारागृहात व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचा दावा बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले याने केला आहे. त्याच्यासाठी स्पेशल चहा दिला जातो, त्याला चांगल्या चपात्या दिल्या जातात. स्वतः सह इतर कैद्यांच्या नावावर तो 25 हजारांची खरेदी कारागृहातील कँटीनमधून करत असल्याचा आरोप बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले याने केला आहे. कासलेनं काल (शनिवारी) याबाबतच एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा वाल्मीक कराडला तुरुंगात मिळणाऱ्या व्हीआयपी ट्रीटमेंटची चर्चा सुरू झाली आहे. तप पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
No comments:
Post a Comment