वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या "एक राज्य एक दस्त" व पॉवर ऑफ ऍटर्णी हा कायदा रद्द करावा यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढारे साहेब यांच्या सूचनेनुसार व अखिल भारतीय मराठा महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष अनिल बापू घराळ यांच्या नेतृत्त्वात कराड चे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी, जिल्हा उपाध्यक्ष धनाजी माने, जिल्हा सरचिटणीस विवेक कुराडे, जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील, कराड दक्षिण तालुकाध्यक्ष युवराज कुराडे जिल्हा सोशल मिडिया प्रमुख सुरज जाधव, कराड द.तालुका उपाध्यक्ष अमर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष किरण पाटील, विद्या मोरे, अर्चना जाधव, जयवंत पाटील, दिलीप पाटील, संदीप जाधव इत्यादी उपस्थितीत होते.
यावेळी राज्यात बनावट व्यक्ती उभी करून बोगस दस्त करणे, मृत व्यक्ती जिवंत दाखवून दस्त नोंदणी होणे, शेतकऱ्यांच्या विशेषतः डोंगरी भागातील मोठ्या प्रकल्पांच्या लगतच्या जमिनी खरेदी करून फसवणूक करणे, कुटुंबातील हिस्से निश्चित झालेले नसताना एका भावाने कुटुंबातील व्यक्तीचे हिस्से विकणे अशा अनेक विषयावरती चर्चा करण्यात आल्या.
No comments:
Post a Comment