Thursday, May 22, 2025

राजेंद्रसिंह यादव यांच्या अध्यक्षतेखाली कराड शहरातून भव्य तिरंगा बाईक रॅली ;

वेध माझा ऑनलाइन
शिवसेना व महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या वतीने कराड शहरातून शिवसेनेचे नेते कराड नगरपरिषदचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या अध्यक्षतेखाली कराड शहरातून भव्य तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली .रॅलीचा प्रारंभ शिवतीर्थ अर्थात दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प हार अर्पण व अभिवादन करून कराडचे प्रांतअधिकारी अतुल म्हात्रे कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर कराड शहर पोलीस ठाण्याचे प्रमुख pi ताशीलदार तहसीलदार कल्पना ढवळे , आरटीओ निरीक्षक कणसे साहेब मलकापूर नगरपरिषद मुख्याधिकारी प्रताप कोळी क न प बांधकाम विभागाचे अभियंता आर डी गायकवाड,उपअभियंता सपना भोरे  शिवसेना नेते राजेंद्रसिंह यादव,
रणजीत पाटील गट विकास अधिकारी प्रताप पाटील शिवसेना व यशवंत विकास आघाडीचे नगरसेवक विजय वाटेगावकर,हणमंतराव पवार, स्मिता हुलवान, गजेंद्र कांबळे, बाळासाहेब यादव, किरण पाटील, निशांत ढेकळे, राहुल खराडे , विनोद भोसले, ओंकार मुळे,तसेच  शिवसेना कराड शहर प्रमुख राजेंद्र माने सातारा उपजिल्हाप्रमुख अक्षय मोहिते व शंकर वीर उपजिल्हाप्रमुख महिला आघाडी सुलोचना पवार उपतालुकाप्रमुख भानुदास पोळ,काकासाहेब जाधव , हरी कुलकर्णी वीज महामंडळ सदस्य गुलाबराव पाटील, मा नगरसेवक प्रमोद वेर्नेकर सातारा जिल्हा मागासवर्गीय प्रमुख अजित भोसले उपशहर प्रमुख राजू खराडे,अशोक शिंदे या यांच्या उपस्थितीमध्ये व कराड नगर परिषद चे आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी आशा सेविका फायर ब्रिगेड यंत्रणा आरोग्य सेवेसाठी ॲम्बुलन्स तसेच शिवसेना शिंदे गटाचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले
हजारो गाड्यांच्या संख्येने शिवसेना तिरंगा बाईक रॅली ची सुरुवात झाली कराड शहरातून, चावडी चौक, कन्या शाळा ,कृष्णा नाका, येथून विजय दिवस चौकात रॅली आल्यानंतर विजय दिवस स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले व पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना दोन मिनिट स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली
पाकिस्तानचे कंबरडे मोडून ऑपरेशन सिंदूर यशस्वी पार पाडणाऱ्य भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ शिवसेना तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली होती रॅलीत कराड शहर व तालुक्यातील सर्व शासकीय निमशासकीय खाजगी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तसेच नागरिक पदाधिकारी विद्यार्थी मित्र सर्व सामाजिक संस्था गणेश व नवरात्र मंडळे तसेच पोलीस प्रशासन व सैन्य भरती प्रशिक्षण संस्था माजी सैनिक यांनी भारतीय सैन्यांच्या समर्थक सन्मानार्थ मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता


भारतीय सैन्य दलाचा अभिमान सर्व देशवासीयांना आहे या देशाच्या अस्मितेवर कोणी घाला घालत असेल तर हा देश छातीचा कोट करून उभा राहील, असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी रॅलीच्या सांगता प्रसंगी केले व शिवसेना तिरंगा बाईक रॅलीची सांगता केली.

No comments:

Post a Comment