Saturday, May 24, 2025

पाकिस्तानात सिंधू नदीच्या पाण्यावरून वाद पेटला / मंत्र्यांचे घर जाळले!

वेध माझा ऑनलाइन । पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांची मुलगी आणि खासदार आसिफा भुट्टो यांच्या ताफ्यावर शुक्रवारी जमावाने हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ शनिवारी समोर आला. पोलिसांच्या माहितीनुसार, आसिफा कराचीहून नवाबशाहला जात होती. दरम्यान, निदर्शकांनी त्यांचा ताफा थांबवला आणि सिंधू नदीवरील वादग्रस्त कालवा प्रकल्प आणि कॉर्पोरेट शेतीविरोधात घोषणाबाजी केली. काही लोकांनी ताफ्यातील वाहनांवर काठ्यांनी हल्ला केला. आसिफा आणि हैदराबाद पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्यांचे वाहन तेथून सुरक्षितपणे हटवले. या संपूर्ण घटनेत कोणीही जखमी झाले नाही. पाकिस्तान सरकार सिंधू नदीवर कालवा बांधण्याचा विचार करत आहे. स्थानिक लोक यामुळे संतप्त आहेत. मंगळवारी सिंधचे गृहमंत्री झियाउल हसन लंजर यांचे घर जाळले होते.

No comments:

Post a Comment