कराडच्या यशवन्त बँकेच्या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. त्यात अन्य बँकाही अडकल्या आहेत. त्यांच्या नावाने ती कर्जे वितरीत केली आहेत.असे असतानाही बँकेचे संचालक व कर्मचारी जबरदस्तीने कर्ज वसुलीसाठी दबाव तंत्राचा वापर करीत आहेत. त्यामुळे या सगळ्याचा विचार करून शासनाने सीबीआय व आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागातर्फे योग्य चौकशी व्हायला हवी. त्यासाठी ठेवीदार व सभासद व फसलेले कर्जदार प्रयत्न करत आहेत. मात्र त्याचा फारसा प्रभाव पडताना दिसत नाही अशी माहिती ठेवीदार संघटनेचे अॅड. निलेश जाधव, एस. डी. कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान यशवंत सहकारी बँकेच्या १४० कोटीपैकी १२७ कोटींचे कर्ज बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगवाकर व त्यांचा कुटूबियांसह त्यांनी स्थापन केलेल्या बनावट संस्थांच्या नावावर आहेत. त्या संबधितांच्या नावावर व्यवहार झाल्याचे ऑडीट रिपोर्टही आहेत असेही एडव्होकेट जाधव म्हणाले
यशवंत बँकेच्या विरोधात ठेवीदार, कर्जदार न्यायालयासहीत पोलिस व अन्य पातळ्यांवर लढा देत आहेत. त्याची माहिती देण्यासाठी अॅड. जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी फसवणुक झालेले ठेवीदाार, कर्जदारही उपस्थित होते.
अॅड. निलेश जाधव म्हणाले, सुमारे दिड वर्षापासून सातत्याने यशवंत बँकेचे सभासद, ठेवीदार व कर्जदार बँकेतील घोटाळ्याबाबत पाठपुरावा करीत आहोत. त्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री शाह यांची राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकाराने दोन दिवसापूर्वी भेट झाली. त्यांच्याशी बैठक झालेल्या बैठकीत खासदार डॉ. कुलकर्णी, मी स्वतः व बँकेचे सभासद संजीव कुलकर्णी उपस्थित होतो. यावेळी गृहमंत्री शाह यांच्याबरोबर बँकेत झालेल्या प्रकाराबाबत सविस्तर चर्चा केली. त्यावेळी त्यांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली आहे.
यशवंत सहकारी बँकेच्या १४० कोटीपैकी १२७ कोटींचे कर्ज बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगवाकर व त्यांचा कुटूबियांसह त्यांनी स्थापन केलेल्या बनावट संस्थांच्या नावावर आहेत. त्या संबधितांच्या नावावर व्यवहार झाल्याचे ऑडीट रिपोर्टही आहेत. त्यामुळे बँकेत आर्थिक घोटाळा झाला आहे, त्याची सीबीआयतर्फे चौकशी करावी, अशी मागणी केंद्रीय सहकारी मंत्री अमित शाह यांना भेटून केली आहे. यासाठी राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांचे महत्वाचे सहकार्य मिळाले आहे, गृहमंत्री शाह यांनीही दोन महिन्यात सिबीआयतर्फे त्या सगळ्याची चौकशी करू, असे अश्वासन दिले आहे, अशीही माहिती ठेवीदार संघटनेचे अॅड. निलेश जाधव, एस. डी. कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
No comments:
Post a Comment