मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीला पुन्हा सत्तेत बसवण्यामध्ये गेमचेंजर ठरली होती. या योजनेनुसार पात्र लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये दिले जातात. लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता 7 मे दरम्यान देण्यात आला होता. आता लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे. महाराष्ट्राच्या आदिवासी विकास विभागानं आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मे महिन्याच्या लाभाचे वितरण करण्यासाठी 335 कोटी 70 लाखांच्या लाभाचं वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. या नव्या अपडेटनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता वाढली आहे.
No comments:
Post a Comment