यशवन्त बँक बुडायची मी वाट बघतोय असे स्वतः शेखर चरेगावकर फोनवर मला म्हटले होते म्हणजेच त्यांनी ही बँक थंड डोक्याने नियोजन करून बुडवली असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट ऍड निलेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत केला आहे
दरम्यान यशवंत बँकेमधील 112 कोटींच्या घोटाळ्यातील संशयीतांना वाचविण्यासाठी भाजपचा राज्यातील एक बडा नेता आणि जिल्ह्यातील आमदार वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे घोटळ्याच्या प्रकरणाची सखोल व निपक्षःपातीपणे चौकशी होवून त्यातली संशयीतांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी देखील यशवंत बँक ठेवीदार व कर्जदार संघटनतर्फे ॲड. निलेश जाधव यांनी काल पत्रकार परिषदेत केली.
खोटी कागदपत्रे सादर करून शेखर चरेगावकर यांचे बंधू मुकुंद चरेगावकर यांनी कराडचे शासकीय विश्रामगृह चालवायला घेतले असल्याचाही गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केला आहे
यशवंत बँकेतील घोटाळ्याप्रकरणात होत असलेल्या पोलीस तपासाच्या दिरंगाईबाबत एडवोकेट निलेश जाधव यांनी आज पत्रकार परिषद घेतली. जाधव म्हणाले, अपहरातील प्रकरणातील ज्या संशयीतांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केलेला नाही. त्यांना पोलिसांनी तत्काळ अटक करणे कर्मप्राप्त आहे मात्र पोलिसांकडून या प्रकरणात जाणून बुजून दिरंगाई केली जात आहे. यशवंत बँकेच्या घोटाळ्यातील ज्या संशयीतांना अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला होता. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ अटक करावी. ज्यांनी अटकपूर्व जामिनसाठी अर्ज केलेला नाही त्यांना अटक केली जात नाही त्यामुळे या प्रकरणाच्या तपासात सगळ्याच पातळीवर दबाव येत आहे. बँकेच्या दोन माजी अध्यक्षांना वाचविण्यासाठी भाजपचा राज्यातील एक बेडा नेता व जिल्ह्यातील एक विद्यमान आमदार प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रकरणातील राजकीय हस्तेक्षप स्पष्ट आहे. तो थांबावा, यासाठी अम्ही प्रयत्न करत आहोत.
या घोटाळा प्रकरनातील ५० पैकी केवळ एकच अटक आहे. तोही माजी अध्यक्षांचा भाऊ आहे. अन्य संशयीत अद्यापही अटक नाहीत. त्यांना त्वरीत अटक करावी. या प्रकरणाचा तपास ईडी, पोलिस व उपनिंबधक अशा तीन स्तरावर सुरू आहे. ईडीच्या ३५ जणांना नोटीसा दिल्या आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने एकास अटक केली आहे. तर १६२ कोटींच्या घोटळ्यातील ५० संशयीतांवर जबाबदारी निश्तीच करण्यासाठी उप निबंधक अपर्णा यादव यांनी नोटीसा बजावल्या आहेत. मात्र तरिही अद्याप या प्रकरनात गती आलेली नाही. केवळ कागदोपत्री खेळ सुरू आहे.
यशवंत बँकेच्या घोटळ्याप्रकणी संशयीतांच्या गुन्ह्यात महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबधाचे वित्ती संरक्षण अधिनियम कलमाची वाढ झाली आहे. त्यामुळे माजी अध्यक्षाचा भाऊ विठ्ठल कुलकर्णी यांना अटक झाली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. ठेवीदारांच्या संरक्षण कायद्या नुसार कारवाई होनार असल्यानेच उर्वरीत संशयीत फरार झाले आहेत. काहींनी अटकपुर्व जामीनासाठी कोल्हापूर खंडपीठात अर्ज केला आहे. त्या संशयीतांची सक्त वसुली संचनालय (ईडी) यांनी नोटीसा काढल्या आहेत. त्यांची मुंबई येथे चौकशी सुरु आहे, असेही अॅड. जाधव यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment