वेध माझा ऑनलाइन
मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवडीसाठी आता अवघे दोन दिवस उरले आहेत. त्यातच आता महायुतीमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महापौरपद आणि स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचा एकत्रित गटनोंदणीचा प्रस्ताव फेटाळला आहे. त्यांनी आपल्या २९ नगरसेवकांची स्वतंत्र गटनोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे
भाजपला मुंबईत आपला महापौर बसवायचा आहे, कारण त्यांच्याकडे नगरसेवकांचे संख्याबळ जास्त आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अडीच वर्षे आमचा महापौर असावा अशी मागणी केली आहे. या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांत एकमत होऊ शकलेले नाही. त्यातच आज दुपारी १२ वाजता शिवसेनेचे सर्व २९ नगरसेवक दादर येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करतील. त्यानंतर हे सर्व नगरसेवक बसने नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील कोकण भवन येथे जाऊन स्वतंत्र गटाची अधिकृत नोंदणी करतील. सध्या एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे गावी आहेत. त्यामुळे राहुल शेवाळे आणि शीतल म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया पार पडणार आहे.
No comments:
Post a Comment