Friday, January 2, 2026

आज साताऱ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कराडच्या भाजपच्या नगरसेवकांचा सत्कार ; सातारा जिल्ह्यातील निवडून आलेल्या नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला सत्कार ;

वेध माझा ऑनलाइन
कराडच्या भाजपच्या नूतन नगरसेवकांचा सत्कार आज मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते साताऱ्यात करण्यात आला यावेळी आमदार डॉ अतुल भोसले मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले जयकुमार गोरे आदि उपस्थित होते

आजपासून साताऱ्यात सुरू झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन करण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते 
दरम्यान सदर कार्यक्रमाचे उदघाटन करून मुख्यमंत्र्यांनी जिल्हापरिषद हॉल येथे आयोजित केलेल्या जिल्ह्यातील भाजपच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या या सत्कार समारंभासाठी आपली उपस्थिती लावली 
यावेळी जिल्ह्यातील 7 नगराध्यक्ष व निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचा त्यांनी सत्कार केला 
आमदार डॉ अतुल भोसले मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा संपन्न झाला

No comments:

Post a Comment