Thursday, January 8, 2026

पक्षांतराला वेग येणार! शिवसेना शिंदे गटात मोठा पक्ष प्रवेश होणार ! महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडणार घडामोडी !

वेध माझा ऑनलाइन।
राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे, जशी-जशी मतदानाची तारीख जवळ येत आहे, तशी-तशी प्रचारात देखील रंगत आल्याचं पहायला मिळत आहे. राज्यात महायुतीच्या प्रमुख नेत्यांकडून सभांचा धडाका सुरू झाला आहे, तर दुसरीकडे यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. तब्बल वीस वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पहयाला मिळत आहे.  एकीकडे सभा आणि बैठकांमधून आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू आहे, प्रत्येक पक्षांकडून मतदारांसमोर आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न होत आहे, तर दुसरीकडे पक्षांतराला देखील वेग आल्याचं पहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटात मोठा पक्ष प्रवेश होणार आहे.

आधी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाल्याचं पहायला मिळालं होतं, आपल्या पक्षाकडून तिकीट मिळणार नसल्याचं दिसताच अनेक इच्छुकांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला होता, सर्वात जास्त इनकमिंग त्यावेळी भाजपात झालं होतं, याचा मोठा फटका हा महाविकास आघाडीला तर बसलाच होता, सोबतच शिवसेना शिंदे गटाला देखील बसला होता, त्यावरून त्यावेळी शिवसेना शिंदे गटानं नाराजी देखील व्यक्त केली होती.

No comments:

Post a Comment