वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबत चर्चांना उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत यासंदर्भात सूचक वक्तव्य केले आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर भविष्यातील राजकीय भूमिकेवर विचार करू, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवत आहेत. अजित पवार यांनी सध्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले असल्याचे म्हटले आहे. निवडणुका संपल्यानंतरच पुढील विचार केला जाईल, असे त्यांचे म्हणणे आहे. “कोण कुणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो,” या त्यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. विशेष म्हणजे, अजित पवारांच्या बंडानंतर पहिल्यांदाच रोहित पवार त्यांच्या प्रचारसभेत उपस्थित राहिले, ज्यामुळे या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.
No comments:
Post a Comment