वेध माझा ऑनलाइन
उद्धव ठाकरे यांच्या निशाण्यावर राज्य निवडणूक आयुक्त असून थेट गंभीर आरोप करण्यात आली आहेत. मतदान याद्यांमध्ये मोठा घोळ असून शाई पुसली जात असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी करत थेट निवडणूक आयुक्तांच्या निलंबनाची मागणी केली आहे.
नुकताच पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप केली आहेत. सत्ताधारी पक्षाचे काम निवडणूक आयुक्त करत असल्याचे त्यांनी म्हटले. मतदानानंतर बोटावरील शाई निघून जात असल्ाचा आरोप केला जात आहे.
राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान प्रक्रिया सुरू असून रश्मी ठाकरे यांनी बोटावरील शाई पुसली जात असल्याचा थेट व्हिडीओ दाखवला असून मोठी खळबळ उडाली आहे.
उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, आयुक्तांवर कारवाई करावीच लागेल. त्यांचा स्टाफ रोज काय करतो. सरकारी पगार खात आहेत. त्यांच्या कार्यालयात राजकीय प्रतिनिधी ठेवावे लागेल. इतकी वर्ष पगार खाता. केलं काय. मी पूर्ण आयोगावर कारवाईची मागणी करतोय. त्यात महापालिका आयुक्त असतील किंवा आयुक्तालयाची माणसं असतील त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. तुम्ही लोकशाही मानत आहात.
देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे लोक हारले आहेत, त्यामुळे या गोष्टी केल्या जात आहेत. उद्धव ठाकरे यांनी थेट म्हटले की, राज्याचे निवडणूक आयुक्तांना तात्काळ निलंबित करा. ते फुकटचा पगार घेत असल्याचा त्यांनी आरोप केला
शाई पुसून मतदान करता येणार नाही-
शाई पुसून मतदान करता येणार नसल्याचे स्पष्ट शब्दात निवडणूक आयोगाने म्हटले आहे. शाई पुसली जात असल्याचा सातत्याने आरोप केला जात आहे. त्यावर स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने दिले आहे.
No comments:
Post a Comment