Tuesday, January 13, 2026

प्रचार संपताच रिक्षेत सापडले 50 लाख ; अपक्ष उमेदवाराने पकडून दिली रोकड ;

वेध माझा ऑनलाइन।
राज्यात महापालिका निवडणुकांच्या प्रचाराची सांगता झाली असून आता उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करता येईल. मात्र, प्रचार पत्रके वाटण्यास मनाई आहे.

एकीकडे प्रचाराची सांगता झाली असताना, दुसरीकडे लक्ष्मीदर्शन होत असल्याचे दिसून येते. दोन दिवसांपूर्वी डोंबिवलीत मतदारांना पैशाची पाकिटे पाठवण्यात आल्याचं उघडकीस आलं होत. आता, एका बॅगेत मोठी रोकड आढळून आली आहे.
उल्हासनगरमध्ये भरारी पथकाने 50 लाख रुपयांची रोकड पकडली असून अपक्ष उमेदवाराने ही रक्कम पकडून दिली आहे. त्यामुळे, नेमकं कुणासाठी एवढा पैसा जात होता, याचा तपास आयोगाकडून सुरू आहे.
अपक्ष उमेदवार नरेश गायकवाड यांनी दुचाकीवर पाठलाग करुन ही रोकड पकडली असून या रकमेची चौकशी केली जात आहे.
उल्हासनगर येथील सुभाष टेकडी चौकात अपक्ष उमदेवारासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी रिक्षा पकडली, या रिक्षात ही बॅग होती. त्यामुळे, रिक्षा चालक आणि रोकड असलेली बॅग पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
उल्हासनगर मनपा निवडणुकीत भाजपच्या प्रदीप रामचंदानी यांच्या कार्यालयातून रक्कम बाहेर आल्याचा आरोप नरेश गायकवाड यांनी केला आहे.
बॅगेतील नोटा मोजण्यासाठी उल्हासनगर विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये नोटा मोजायचे मशीन आणण्यात आल्या आहेत. पोलिसांनी बंद रुममध्ये पंचनामा करत नोटा मोजण्याचे काम सुरू केले आहे.

No comments:

Post a Comment