Thursday, January 8, 2026

नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या प्रयत्नाने व ओंकार मुळे यांच्या पाठपुराव्याने "त्या ' रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू ;

वेध माझा ऑनलाइन।
कराड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव  यांच्या प्रयत्नातून व प्रभाग क्र 10 चे सामाजिक कार्यकर्ते ओंकार मुळे यांच्या पाठपुराव्यामुळे शनिवार येथील अशोक चौक ते मारुती चौक तसेच रविवार पेठ आणि  शुक्रवार पेठ येथील आझाद चौक ते सात शहीद चौक या दोन ठिकाणच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे

दरम्यान 
या कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी आला होता यामध्ये भुयारी गटार व कार्पेट रस्त्यासाठी कामे मंजूर झाली या कामाचे भूमिपूजनही झाले होते ही कामेही सुरू झाली होती मात्र पावसाळ्यात ही कामे अर्धवट स्थितीत थांबली होती 
गुरुवार पासून या कामाला सुरुवात करा अशा सुचना नगराध्यक्ष यादव यांनी दिल्या आहेत त्यामुळे पुन्हा या कामाला गती मिळाली आहे

No comments:

Post a Comment