वेध माझा ऑनलाईन।
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ऐन महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानं भाजपला मोठा धक्का दिला आहे. राजकारणात मोठं ट्विस्ट आल्याचं पहायला मिळत आहे.
राज्यात सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराला देखील वेग आला आहे. महाराष्ट्रातील 29 महापालिकांसाठी निवडणुका होणार आहेत. दरम्यान यातील अनेक महापालिका निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती झाली आहे. सध्या सर्व राज्याचं लक्ष हे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे लागलं आहे, कारण मुंबई महापालिका निवडणुकीच्या मैदानात एकीकडे शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती आहे, तर दुसरीकडे या युतीपुढे मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत मोठं आव्हान निर्माण केलं आहे. दरम्यान काही महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती देखील पहायला मिळत आहे. तर ज्या ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गटासोबत युती होऊ शकली नाही, तिथे राष्ट्रवादी अजित पवार गटानं राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत युती केली आहे. दरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटानं भाजपला मोठा धक्का दिला आहे.
अंबरनाथ नगरपालिकेच्या सत्तास्थापनेत मोठा ट्विस्ट आला आहे. कारण कालपर्यंत भाजपासोबत असलेल्या राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांनी आज अचानक शिवसेनेला समर्थन दिलं आहे. त्यामुळं शिवसेनेची अंबरनाथ पालिकेवरील सत्ता कायम राहणार आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या गेमचेंजर ठरलेल्या या नगरसेवकांमुळे आता भाजपला सत्तेपासून दूर रहावं लागणार आहे.
No comments:
Post a Comment