Tuesday, January 13, 2026

अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये म्हणाले... माझ्या सभेला परवानगी मिळू नये म्हणून पोलिसांवर दबाव आणला गेला ;

वेध माझा ऑनलाइन।
सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येत्या 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसांठी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी मतमोजणी होईल. दरम्यान आता प्रचार संपलेला असून सगळ्यांचे लक्ष मतदानाकडे लागले आहे. आजच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांनी मोठ्या सभांचा धडाका लावला होता. विशेष म्हणजे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी एकमेकांवर नेतेमंडळी सडकून टीका करताना दिसले. या सर्व महापालिकांच्या निवडणुकीत पुणे आणि पिंपरी चिंचवडची महानगरपालिका निवडणूक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या दोन्ही महापालिका जिंकण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्ण ताकद लावली असून आकर्षक आश्वासनं दिली आहेत. प्रचारादरम्यान अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांवर टीकादेखील केली आहे. असे असतानाच आता अजित पवार यांनी खळबळजनक विधान केले आहे. 

अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये बोलत होते. यावेळी बोलत असताना त्यांनी माझ्या सभेला परवानगी मिळू नये म्हणून पोलिसांवर दबाव आणला गेला, असा दावा अजित पवार यांनी केला. आज पहाटे पाच वाजता माझ्या सभेला परवानगी दिली. माझ्या सभेला परवानगी मिळू नये म्हणून पोलिसांवर दबाव आणण्यात आला, असे म्हणत यांच्या काकाने अशी परवानगी दिली होती का? असा संतापजनक सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. 

No comments:

Post a Comment