वेध माझा ऑनलाइन
महानगरपालिका निवडणूक जाहिर झाल्यानंतर विरोधी पक्षांकडून सातत्याने निवडणूक आयोगाच्या कारभारावर शंका उपस्थित केली जात आहे. आज सकाळ पासून सुरु असलेल्या मतदानानंतर बोटावर लावली जाणारी शाई पुसली जात असल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत यंदा मतदान करणाऱ्या नागरिकांच्या बोटावर शाईऐवजी मार्करने खूण केली जात आहे. पण ही मार्करने केली जाणारी खूण पुसली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आई आणि पत्नीसोबत नागपूरमध्ये मतदान करण्यासाठी गेले आहेत. तेथे मतदान केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांना बोटावर लावली जाणारी शाई नसून मार्कर आहे आणि ते पुसले जात आहे याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी, असं आहे की, पहिल्यांदा तर या सर्व गोष्टी निवडणूक आयोग ठरवतं आणि यापूर्वीही अनेक वेळा मार्कर पेन वापरण्यात आले आहे. तथापी जर कोणाचा काही आक्षेप असेल तर निवडणूक आयोगाने या संदर्भात लक्ष द्यावे. मात्र, मला असं वाटतय काही लोक उद्याचा निकाल प्रिएम्प्ट करुन निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी करत आहेत हे मात्र स्पष्ट दिसत आहे असे म्हटले आहे.
No comments:
Post a Comment