कराड नगरपालिकेतील भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक विजय वाटेगावकर (गुंड्याभाऊ) यांची भाजपच्या नगरपरिषद गट पक्षनेते पदी निवड करण्यात आली आहे. ते विरोधी पक्ष नेते म्हणून काम पाहणार आहेत.
दरम्यान वेध माझा ने श्री वाटेगावकर व श्री पवार या दोघांचीही निवडी याच पदावर होणार असल्याचा खात्रीशीर अंदाज काही दिवसांपूर्वी व्यक्त केला होता आणि आज तशाच निवडी झाल्या असल्याने वेध माझा चा याबाबतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे त्यामुळे वेध माझा चे अनेक मान्यवरांनी याबाबत फोन करून अभिनंदन केले आहे
आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या सूचनेनुसार...
भाजप कराड नगरपरिषद गट पक्षाच्या सर्व नेत्यांची आणि कराड नगरपरिषदेतील भाजपच्या सर्व निर्वाचित नगरसेवकांची बैठक झाली. यात नगरसेवक विजय पांडुरंग वाटेगावकर यांची कराड नगरपरिषदेत भाजप गटाच्या सभागृहातील पक्ष नेतेपदी एकमुखाने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या गैरहजेरीत नगरसेवक शिवाजी पांडूरंग पवार हे काम पाहतील, असा निर्णय घेण्यात आला.
याबाबतचे पत्र भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना दिले आहे.
तसेच मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांना देण्यात आले.
नगरसेवक शिवाजी पवार यांची पक्षप्रतोद पदी निवड करण्यात आली आहे. तसेच व्हीप बजावण्याचे अधिकारही त्यांना देण्यात आले आहेत.
विजय वाटेगावकर यांनी 2006 पासून पालिकेत नगरसेवक म्हणून काम पाहिले आहे. सलग तीन निवडणुकीत ते नगरसेवक आहेत. आरोग्य समितीचे सभापती म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. पालिकेच्या कामकाजाचा त्यांना मोठा अनुभव आहे. भाजप नगरसेवकांमध्ये सर्वात अनुभवी असल्याने त्यांची सभागृह गटनेते पदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान भाजपचे गटनेते व दहा सदस्यांची फ्लोअर टेस्ट आणि नोंदणी करण्यात आली.
No comments:
Post a Comment