नुकत्याच झालेल्या कराड पालिकेच्या निवडणुकीत भाजपला एकूण 10 जागा मिळाल्या त्यामध्ये आमदार डॉ अतुल भोसले यांचे निष्ठावन्त माजी नगरसेवक सुहास जगताप हे यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरले नाहीत मात्र त्यांच्या मागील कामाची पावती तसेच यावेळी निवडणुकीत केलेले पक्षाचे चोख काम याची दखल घेत त्यांना यावेळी स्वीकृत म्हणून भाजपकडून फायनल केल्याचे खात्रीलायक समजते
माजी नगरसेवक सुहास जगताप हे शहरातील भाजपचे युवा नेते म्हणून परिचित आहेत माजी आमदार डॉ अतुल भोसले यांचे ते निष्ठावन्त म्हणून ओळखले जातात कोणाला कसलीही अडचण असेल तर ते व त्यांचे कार्यकर्ते मदतीसाठी नेहमीच पुढे असतात ते मागील टर्मला नगरसेवक म्हणून शहरात नगरसेवक म्हणून कार्यरत होते त्यांनी केलेले सामाजिक व पक्षाचे काम शहरात चर्चेत राहिले शहर अध्यक्ष म्हणून भाजपचे तेच दावेदार होते मात्र त्यांची ती संधी देखील मागीलवर्षी हुकली होती
एकूणच त्यांचा पालिकेतील कामकाजाचा आतापर्यंतचा अभ्यास, केलेले सामाजिक तसेच पक्षाचेही काम याचा विचार करून त्यांची भाजपने पालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून यावेळी निवड केली आहे असे खात्रीलायक समजते
No comments:
Post a Comment