ना एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कराड पालिकेला भरपूर निधी यापूर्वी देण्यात आला आहे त्याचे काय झाले हे मी बघणार आहे... त्याचे प्रगतीपुस्तक मी तपासणार आहे... असे सांगत मला थातुरमातुर उत्तरे दिलेलं नाही चालत असा सज्जड दम मंत्री शंभुराज देसाई यांनी काल पालिकेतील आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिला
राजेंद्रसिंह यादव यांनी शहराच्या प्रलंबित प्रश्नाबाबत ना देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड पालिकेत मीटिंग आयोजित केली होती यावेळी माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासह जिल्ह्यातील संबंधित शासकीय अधिकारी उपस्थित होते
ना देसाई म्हणाले...
शहरातील पाणीप्रश्नाबाबतचे विषय पुढील शिल्लक कालावधीत सोडवावेत रस्ता हस्तांतरण प्रश्न देखील लोकांशी चर्चा करून मार्गी लावावेत
राजेंद्रसिंह यादव म्हणाले...
जरी 4 वर्षे प्रशासन होते तरी शहरातील कामे मीच करून घेतली आहेत घनकचरा पाणीप्रश्न तसेच भुयारी गटार योजनांच्या बाबतीत शासकीय अडचणी आहेत त्या मंत्रालय स्तरावर सोडवाव्या लागतील त्यानंतर शहरातील प्रकल्प पूर्ण होण्यास मदत होणार आहे
माजी आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले...
अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या हिताची कामे करावीत कोणा एका ठेकेदारांची बाजू घेणे अधिकाऱ्यांना शोभत नाही पक्षीय राजकारण बाजूला ठेवून काम होणे अपेक्षित आहे
यावेळी मुख्याधिकारी व्हटकर म्हणाले...
जी कामे आचार साहितेपुर्वी मंजूर झाली आहेत त्याची टेंडर प्रोसेस पूर्ण झाली आहे या महिन्याअखेर पर्यंत ती कामे आम्ही सुरू करू
No comments:
Post a Comment