Monday, April 27, 2026

कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला : काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाईन
मुंबईतील पायधुनी भागात एका अत्यंत धक्कादायक घटनेत एकाच घरातील चार सदस्यांना आपले प्राण अकारण गमवावे लागले आहेत. रात्रीचे जेवण आणि फळ खाल्ल्यानंतर त्यांच्या शरीरात विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या भयंकर प्रसंगामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस प्रशासन या मृत्यूंमागील खऱ्या कारणाचा कसून शोध घेत आहेत.

नेमकी बातमी काय ?
रविवारी रात्रीच्या वेळी डोकाडिया कुटुंबाने आपल्या इतर नातेवाईकांसोबत मिळून बिर्याणीवर ताव मारला होता. त्यानंतर मध्यरात्री साधारण दीड वाजताच्या सुमारास त्यांनी कलिंगड खाल्ले. यानंतर काही क्षणांतच या कुटुंबातील सदस्यांना जुलाब आणि उलट्यांचा प्रचंड त्रास जाणवू लागला. त्रास इतका वाढला की घरातील चारही जण अचानक बेशुद्ध अवस्थेत कोसळले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून तातडीने तेथील स्थानिक डॉक्टरांना पाचारण करण्यात आले.
वैद्यकीय तज्ज्ञ तिथे पोहोचले तेव्हा सर्वांचीच अवस्था अतिशय चिंताजनक बनली होती. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना तात्काळ जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सर्व वैद्यकीय प्रयत्न निष्फळ ठरले आणि उपचारादरम्यान चौघांनीही अखेरचा श्वास घेतला. या हृदयद्रावक घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये अब्दुल्ला डोकाडिया त्यांची पत्नी नसरीन डोकाडिया तसेच त्यांच्या आयशा आणि झैनब  या दोन मुलींचा समावेश आहे.
दरम्यान मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून आता अन्नाचे तसेच त्या फळाचे काही नमुने जप्त करण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment