Friday, April 24, 2026

बीडच्या तरुंगातील कैद्यांचे वाल्मिक कराड बाबतचे "ते' संभाषण व्हायरल;

वेध माझा ऑनलाईन।
 गेल्या काही दिवसांपासून बीडच्या  तरुंगातील कैद्यांचे संभाषण चांगलेच व्हायरल झालं आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराड आणि गँगकडून इतर कैद्यांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप होत आहे. त्याच अनुषंगाने सलग दोन दिवस अझहर पठाण नामक कैद्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती. त्यात पहिल्या रेकॉर्डिंग मध्ये तो वाल्मिक कराडच्या गँगकडून आपल्याला अमानुष मारहाण झाल्याचे सांगत आहे. तर दुसऱ्या रेकॉर्डिंगमध्ये वाल्मिक कराड यांना बदनाम करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता, म्हणून मी तसं बोललो असंही तोच म्हणत आहे. आता, बीड कारागृहातील कैदी सनी आठवलेची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे.  

बीड कारागृहात कैदी असलेल्या सनी आठवले याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली असून वाल्मिक कराडचा जेलमध्ये दबदबा असल्याचे त्याने म्हटले. तसेच, अजहर पठाणवर दबाव आणत आहेत, त्याला मारहाण झाली आहे, त्याचा खुबा उपसला आहे, असेही तो सांगतो. या संदर्भात सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्याने या कॉल रेकॉर्डिंगमधून केली आहे.

No comments:

Post a Comment