कराड पालिकेचे तत्कालीन वादग्रस्त मुख्याधिकारी शंकर खंदारे यांचा आणखी एक रस्ता घोटाळा पालिकेचा शुक्रवारी झालेल्या सभेत समोर आला. सोमवार पेठेत ६ मीटरचा रस्ता हा ९ मीटर करण्याचा ठराव तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी बिल्डरच्या फायद्यासाठी मंजूर केल्याची धक्कादायक माहिती नगरसेवक अजय पावसकर यांनी पालिका सभेत दिली. तसेच सोमवार पेठेतील सुमारे ५० ते ५५ घरे बाधित होणार असून खंदारे यांचा तो ठराव रद्द करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान शहरातील होकर झोन चा विषय पालिकेत सभेत आला त्यावरही सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी दीर्घकाळ चर्चा केली होकर झोन चे आठ झोन तयार करण्यात आले आहेत त्यातील दोन झोनना भाजपने विरोध दर्शवला
कराड नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवार, दि. १७ रोजी पालिकेच्या सभागृहात नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीस दुखवट्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर प्रत्यक्ष सभेस सुरुवात झाली. सभेच्या सुरुवातीसच नगरसेवक अजय पावसकर यांनी सोमवार पेठ येथील रस्त्याचा प्रश्न उपस्थित केला. त्यांनी तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी सोमवार पेठेतील रस्ता हा सहा मीटरचा असताना देखील तो नऊ मीटरचा करून त्याचा ठराव मंजूर केला आहे. यात ५० ते ५५ घरे बाधित होत आहेत. नागरिकांनी रस्त्याचा ठराव रद्द करावा, अशी देखील मागणी केली आहे. तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी ठेकेदाराकडून पैसे घेऊन रस्त्याचे काम केले असल्याचा आरोप पावसकर यांनी केला. यावर नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी मला याबाबत कालच समजले असून याची योग्य ती चौकशी केली जाईल, असे सांगितले.
त्यानंतर उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे यांनी शहरातील ड्रेनेजचा विषय मांडला असता विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर यांनी ड्रेनेजच्या कामांवर आक्षेप घेतला. रस्त्याची जी अपूर्ण कामे आहेत ती कॉन्ट्रॅक्टर नक्की स्वतः काम करणार आहेत की दुसऱ्याकडून करणार आहेत? आणि वारंवार निकृष्ट दर्जाची कामे करून ते नगरपालिकेचे आणखी किती नुकसान करणार आहेत? असा सवाल करीत अशा पालिकेचे नुकसान करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे,
कॉन्ट्रॅक्टरने पूर्ण शहरात ड्रेनेज स्वच्छता करण्याचे काम पूर्ण केले नसून ड्रेनेज जाम होत आहे. काम नक्की केलं आहे का हे तपासले पाहिजे. ड्रेनज पाईप चौकप होत आहे.
मलकापूर नगरपरिषदेचे सांडपाणी ड्रेनेज, नाल्याद्वारे कराडच्या कृष्णा, कोयना नदीत मिसळत असल्याने नदीप्रदूषण होत असून याबाबत कठोर भूमिका पालिका प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी सर्व नगरसेवकांनी केली. रस्त्यावरील खोदकाम, हॉकर्स झोन, भाजी मंडईतील प्रश्न आदींसह सुमारे १५६ विषयांवर चर्चा करण्यात आली.
भाजी मंडईतील कट्टे नव्याने विकसित करण्यात येणार असल्याची माहिती पाणी पुरवठा सभापती अल्ताफ शिकलगार यांनी दिली.
मुंडे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून मंडई परिसरातील आकर्षेही पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी नगरसेवकांनी रस्त्यावरील मंडई लवकरात लवकर मंडईच्या आत न्यावी अशा स्वरूपाच्या मागण्या केल्या.
आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी वाराणसीतील कचरा प्रकल्पाची माहिती देत हा प्रकल्प कराड नगरपालिकेने राबवावा यासाठी त्या प्रकल्पाची भेट देऊन पाहणी करावी असे सुचवले नगराध्यक्ष राजेंद्र श्री यादव यांनी कराड शहरातील सर्व नगरपालिकेच्या शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी तसेच पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी मंजूर झाला असल्याचे सांगितले.
कराडच्या मुख्य बाजारपेठेत हायटेक टॉयलेट्स चार ठिकाणी उभारण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंग यादव यांनी सांगितले शहरातील होकर जून चा विषय पालिकेस सभेत आला त्यावरही सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी दीर्घकाळ चर्चा केली होकर झोन चे आठ झोन तयार करण्यात आले आहेत त्यातील दोन झोनना भाजपने विरोध दर्शवला गजानन हाउसिंग सोसायटीची वाढीव पानेपट्टी रद्द करून ती पूर्वीप्रमाणे आकारण्याचा विषय ही एकमताने मंजूर झाला
No comments:
Post a Comment