Monday, April 13, 2026

पाकिस्तान कलाकारांनी केली आशाताईंच्या निधनावर हळहळ व्यक्त ;

वेध माझा ऑनलाईन।
दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाही तर, संपूर्ण जगभरात फार मोठी आहे. आशा भोसले यांनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली चाहत्यांच्या मनावर आणि संगीतविश्वावर राज्य केलं. पण अचानक आशा भोसले यांच्या निधनाची बातमी समोर आली आणि सेलिब्रिटींसह चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. महत्त्वाचं म्हणजे फक्त भारतीय सेलिब्रिटींनीच नाही तर, पाकिस्तान कलाकारांनी देखील आशा ताई यांच्या निधनावर हळहळ व्यक्त केली आहे.

अभिनेता अहसान खान सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला, “एका युगाचा अंत झाला आहे.” अभिनेता अदनान सिद्दीकी म्हणाला, “अगदी शांत क्षणांनाही भावनांनी भरून टाकण्याची शक्ती त्यांच्यामध्ये होती. आज ती शांतता खूप जड वाटत आहे. तुम्ही आम्हाला दिलेल्या भावनांसाठी, निर्माण केलेल्या आठवणींसाठी आणि मागे सोडलेल्या जादूसाठी धन्यवाद. तुमचा आवाज नेहमीच ऐकू येईल, कुठे ना कुठे, कोणत्या ना कोणत्या रूपात.”

No comments:

Post a Comment