Tuesday, April 28, 2026

भाजपकडून विधानपरिषदेसाठी 5 उमेदवारांची यादी जाहीर; विवेक कोल्हे, प्रज्ञा सातव, माधवी नाईक संजय भेंडे यांची नावे आघाडीवर ; प्रत्येकाने पक्षासाठी केलंय मोठं काम ;

वेध माझा ऑनलाइन ।
राज्याचं लक्ष लागलेल्या विधानपरिषद निवडणुकांच्या उमेदवारांपैकी पहिल्यांदा भाजपकडून 5 नावांची घोषणा झाली आहे. भाजपच्या संसदीय कमिटीच्या मान्यतेनंतर भाजपने अधिकृतपणे महाराष्ट्रातील 5 विधानपरिषदांच्या जागेसाठी पाच नावांची घोषणा केली. त्यामध्ये, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या प्रज्ञा सातव यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. तर, अहिल्यानगरमधील विवेक कोल्हेंना संधी विधानपरिषदेची संधी मिळाली आहे. सुनिल कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांना उमेदवारी जाहीर केली आहे.  विवेक कोल्हे यांचं नाव निश्चित झाल्याच्या कालपासून चर्चा सुरु होत्या. विवेक कोल्हे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. प्रमोद जठार हे सिंधुदुर्गमधील भाजप नेते असून त्यांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे.
भाजपने जाहीर केलेल्या 5 नावांमध्ये माधवी नाईक यांचंही नाव असून ते अनेक वर्षांपासून भाजप संघटनेत काम करतात. तर, संजय भेंडे भाजपचे उपाध्यक्ष असून ते नागपूर भाजपचे जिल्हाध्यक्ष राहिले आहेत. तसेच, प्रमोद जठार यांनाही भाजपने संधी दिली असून जठार हे कोकणातील भाजपचे महत्त्वाचे नेते आहेत. कोकणावर अन्याय होत असल्याची भावना भरुन काढण्याचा प्रयत्न भाजपकडून या उमेदवारीच्या माध्यमातून करण्यात आला आहे.


विवेक कोल्हे... 
यांनी काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. वाढदिवसानिमित्ताने ही भेट घेतली असल्याची सूत्रांची माहिती होती. कोल्हे परिवाराचे नगर जिल्ह्यात वर्चस्व मानले जाते.  विवेक कोल्हे हे ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांचे नातू तर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव आहेत. अहिल्यानगरमधील कोपरगावात काळे-कोल्हे असा जुना संघर्ष आहे. विधानसभा निवडणुकीवेळी आशुतोष काळे यांना राष्ट्रवादी कांग्रेसनं कोपरगावमधून संधी दिल्यानंतर भाजपकडून कोल्हे यांना महायुतीचा धर्म पाळण्याचे आदेश दिले होते.
पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी
काँग्रेसच्या विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देत प्रज्ञा सातव भाजपमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यांच्या रिक्त जागेवर भाजपनं त्यांना उमेदवारी दिली आहे.




No comments:

Post a Comment