वेध माझा ऑनलाइन
आम्ही युती म्हणून एकत्र काम करतो आहे. जिल्हा परिषदेला जे झालं ते स्थानिक राजकारण होतं. जिल्हा परिषदेत भाजपला 28 जागांचे बहुमत मिळालं होते. मात्र, जाणून बुजून आम्हाला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न सुरू होता. एकत्र काम करू, असं आमचे म्हणणे होते. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही.
रायगडमध्ये टोकाचा विरोध असताना देखील राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केलीच ना, असे सांगत साताऱ्यात एवढा टोकाचा विरोध तरी नव्हता, असे मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत. हा जिल्ह्याचा विषय होता आणि तो विषय आता संपला आहे, असं देखील शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटले आहे.
दरम्यान शिवसेनेचे जे सदस्य आमच्या सोबत आले त्यांना तुम्ही सांभाळू शकला नाही, असा टोला देखील मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी शंभूराज देसाईना लगावला आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे या भाजपच्या पदाधिकारी आहेत. त्या भाजपच्या असल्याने आम्ही त्यांचे नाव पुढे केले. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे जे सदस्य आमच्या सोबत आले त्यांना ते सांभाळू शकले नाहीत, असा टोला देखील मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी शंभूराज देसाईना लगावला आहे.
शिवसेनेला भाजपाचा धोका वाटतो का? हे त्यांना विचारले पाहिजे, अशी कोपरखळी देखील त्यांनी लगावली.
आमचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली सध्या जिल्ह्याचे काम चांगले सुरू आहे आणि त्यांच्यावर विश्वास आहे, असे देखील शिवेंद्रराजे भोसले म्हणाले.
No comments:
Post a Comment