Sunday, April 26, 2026

सौ सोनल भोसेकर " रेणुकाई पुरस्काराने” सन्मानित.; नांदेड येथे परशुराम तेजोत्सव कार्यक्रमात झाला सन्मान ;

वेध माझा ऑनलाईन।
नांदेड येथे आयोजित भव्य परशुराम तेजोत्सव कार्यक्रमात उद्योजिका व उद्योगिनी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ. सोनल भोसेकर यांना त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल “रेणुकाई पुरस्कार” देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.
 
ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे, राज्यमंत्री कॅप्टन आशिष दामले, डॉ. गोविंदजी कुलकर्णी , माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, निखिल लातूरकर यांच्या हस्ते सौ भोसेकर यांचा हा  सन्मान करण्यात आला.

सौ. सोनल भोसेकर यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आल्याचे सांगण्यात आले  

No comments:

Post a Comment