Monday, April 13, 2026

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलीस ठाण्यात हजर ; अशोक खरातशी संबंधित १३२ खात्याचं गूढ उकलणार का?

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर आज शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाल्या आहेत. अशोक खरातशी संबंधित १३२ खात्याचं गूढ उकलणार का, याची चर्चा सुरू आहे.महिलांचे शोषण आणि अनेकांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी तुरुंगात असणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणातील चौकशीला वेग आला आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर हे शिर्डी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी दाखल झाल्या आहेत.


राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर आज शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाल्या आहेत. समता पतसंस्थेतील बहुचर्चित १३२ संशयास्पद खात्यांच्या प्रकरणात ही मोठी कारवाई मानली जात आहे. अशोक खरात नॉमिनी असलेल्या या खात्यांमधून झालेल्या मोठ्या आर्थिक व्यवहारप्रकरणी पोलिसांनी चाकणकर यांची चौकशी सुरू केली आहे.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, यापैकी चार खाती प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर आहेत. यामध्ये प्रतिभा चाकणकर यांच्या नावे दोन, तर त्यांच्या मुलांच्या नावे दोन खाती असल्याचे निष्पन्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलांच्या नावावर असलेल्या या चार खात्यांमधून आतापर्यंत तब्बल २ कोटी ४० लाख रुपयांचे व्यवहार झाले आहेत. इतकी मोठी रक्कम खात्यात कोठून आली आणि या व्यवहारांचे स्वरूप काय होते, या दिशेने शिर्डी पोलीस तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment