शिवसेनेच्या सातारा जिल्ह्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवक यांचा भव्य सत्कार आणि जाहीर सभा साताऱ्यातील गांधी मैदानावर आयोजित करण्यात आली. या सभेला शिवसेनेचे मुख्यनेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते यावेळी साताऱ्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी झालेल्या घडामोडींवर भाष्य केलं. ते म्हणाले साताऱ्याचं जनमत मताचा कौल शिवसेना- राष्ट्रवादीच्या निवडणूक पूर्व युतीलाच होता. सातारा जिल्ह्यात शिवसेना वाढत असून त्याचं कारण एकनाथ शिंदे असल्याचं देखील शंभूराज देसाई म्हणाले.
मंत्री देसाई पुढे म्हणाले...
गेल्या काही महिन्यांमध्ये नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. याच्या अगोदर जिल्हा परिषदेत शिवसेनेचे दोन सदस्य निवडून आले होते. शिवसेनेचं तिकीट मिळालं नाही म्हणून विजय पवार आघाडी करुन उभा राहिला. शिवसेनेचे तीन जिल्हा परिषद सदस्य होते. आज आम्हाला तुम्हाला सांगताना आनंद होतो, जिल्हा परिषद सदस्यसंख्या तीन वरुन पंधरावर गेले आहेत. 29 पंचायत समिती सदस्य आहेत, जवळपास 30-32 नगरसेवक आहेत. एक पंचायत समिती सभापती, तीन पंचायत समित्यांमध्ये उपसभापती, एका नगरपालिकेचा नगराध्यक्ष लोकांच्या आशीर्वादानं निवडून आणला आहे. सामान्य जनतेच्या पाठबळावर निवडून आणलेला आहे,आज जिल्ह्यात आशावादी नेतृत्व एकनाथ शिंदे यांचं वाटतं, असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं.
No comments:
Post a Comment