Monday, April 6, 2026

विद्या मोरे यांना ‘बेस्ट पीआरओ ऑफ रीजन’ पुरस्कार; पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी आणि सामाजिक उपक्रमांमध्ये प्रभावी योगदानाची दखल ;

वेध माझा ऑनलाइन।
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या सातारा जिल्हा अध्यक्ष आणि युथ पदावर कार्यरत लायन विद्या मोरे यांना फलटण येथे पार पडलेल्या रिजन कॉन्फरन्समध्ये ‘बेस्ट पीआरओ ऑफ रीजन’ हा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला यावेळी लायन्स क्लबच्या विविध विभागीय प्रतिनिधी उपस्थित होते.

विभागीय सभापती MJF लायन नीलम पाटील यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. पुरस्कार देताना त्यांनी विद्या मोरे यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील कामगिरीचे कौतुक केले आणि क्लबच्या सामाजिक उपक्रमांच्या प्रभावी प्रचारासाठी त्यांचे विशेष योगदान मान्य केले

झोन चेअरमन मंजिरी खुस्पे यांनी ही त्यांच्या कार्याचे कौतुक केले .विद्या मोरे यांनी लायन्स सोशल उपक्रमांमध्ये उत्कृष्ट (पीआरओ) चे कार्य करत संस्थेची प्रतिमा मजबूत केली आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे उपक्रमांना स्थानिक तसेच प्रादेशिक पातळीवर अधिक ओळख मिळाली असून, उपस्थित मान्यवरांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

कार्यक्रमात विद्या मोरे यांचे यश साजरे करत उपस्थितांनी त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या पुरस्काराने पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याला आणि सामाजिक उपक्रमांमध्ये केलेल्या योगदानाला मान्यता मिळाल्याचे ठळक उदाहरण निर्माण झाले आहे.कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी असेही नमूद केले की, विद्या मोरे यांचे कार्य युवा वर्गासाठी प्रेरणादायी आहे आणि लायन्स क्लबच्या उद्दिष्टांची ओळख अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यास मोठे योगदान ठरते.

No comments:

Post a Comment