हनुमान जयंतीच्या निमित्ताने योगेश्वर लोहाना परिवाराच्या वतीने श्री हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ८ ते १२ या वेळेत विधीवत पूजा-अर्चा करण्यात आली तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या पवित्र दिवशी हनुमानाची भक्ती, सेवेची प्रेरणा आणि समाजसेवेची भावना जोपासत योगेश्वर लोहाना परिवाराने कराड नगरपालिका शाळा क्र. ४ येथील विद्यार्थी-विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप केले.
या कार्यक्रमाला लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष डॉ. सतीश शिंदे, नगरसेवक ओंकार मुळे, जनशक्ती आघाडीचे अरुणराव जाधव, रमेश लुणिया, सुरेश लुणिया, सिंधी पंचायतीचे बलराम सचदेव, इदनदास तलरेजा, मनोहर सचदेव, अभिजीत पाडळे, समीर नदाफ, तसेच बेळगाव येथील उद्योजक आदर्श गुलबानी, चिंगळे काका आणि योगेश्वर लोहाना परिवाराचे सदस्य उपस्थित होते. यावेळी शाळा क्र. ४ च्या शिक्षिकाही उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment