Friday, April 10, 2026

तेजस्विनी घोरपडे यांची भाजपा महिला मोर्चा सातारा जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कराडात स्वागत ;

वेध माझा ऑनलाइन।
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सातारा जिल्हाध्यक्षपदी मा. सौ. तेजस्विनी ताई संग्राम घोरपडे यांची निवड झाल्यानंतर कराड शहरात त्यांच्या स्वागताचा उत्साही कार्यक्रम पार पडला. भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकारी तसेच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

वेध माझा ऑनलाइन...वेध माझा ऑनलाइन...

यावेळी तेजस्विनी घोरपडे यांनी कराड येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळी जाऊन अभिवादन केले. राज्याच्या राजकारणातील दिग्गज नेते असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याला आदरांजली अर्पण करत त्यांनी प्रेरणा घेतल्याचे सांगितले.

 वेध माझा ऑनलाईन... वेध माझा ऑनलाइन...

यानंतर बोलताना तेजस्विनी घोरपडे म्हणाल्या की, सातारा जिल्ह्यात महिला सबलीकरण, महिला संघटन आणि महिलांना राजकीय व सामाजिक क्षेत्रात अधिक संधी मिळाव्यात यासाठी पुढील काळात विशेष भर दिला जाईल. महिलांना सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला

वेध माझा ऑनलाइन... वेध माझा ऑनलाइन...

या प्रसंगी भारतीय जनता पार्टी कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे हेही उपस्थित होते. त्यांनी तेजस्विनी घोरपडे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

वेध माझा ऑनलाइन... वेध माझा ऑनलाइन...

कार्यक्रमाला कराड उत्तरमधील भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

No comments:

Post a Comment