वेध माझा ऑनलाइन।
विधानपरिषदेत रिक्त झालेल्या ९ जागांसाठी निवडणुका होत आहेत. यामध्ये शिवसेनेच्या कोट्यात दोन जागा आहेत. यापैकी एका जागेवर बच्चू कडूंना संधी देण्याची तयारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू त्यांचा पक्ष शिवसेना शिंदे गटात विलीन कऱणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र बच्चू कडू यांनी विलीनकरणाचा मुद्दा फेटाळून लावला आहे. आमदारकीसाठी शिंदेसोबत जाण्याइतका बच्चू कडू नालायक नाही अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिलीय.
बच्चू कडूंची विधानपरिषदेवर वर्णी लागणार, विधान परिषदेवर आमदार होणार अशा चर्चा होत आहेत. या चर्चांबाबत विचारले असता बच्चू कडू म्हणाले की, मी शेतकरी शेतमजूरांचा आवाज उठवणारा माणूस आहे. शिंदे साहेबांनी हा निर्णय घेतला तर शेतकऱ्यांचा सन्मान होईल. जाती धर्माच्या नावावर लोक मेंढरासारखे जातात. आमदारकीसाठी जाणार नाही.
पदासोबत युती करणारे आम्ही नाही.
विलीनकरणाच्या बातम्या वाचल्या. खरंतर मी शिवसैनिकच होतो, शिवसेनेतून दुसऱ्या पक्षात गेलो नाही. प्रहार सुरू केली. पाठिंबा देतो म्हटलं तरी घेतला नाही. २५ वर्षे तटस्थ भूमिका घेतली. खासदारकी द्या युती करा असं म्हटलं नाही. जनतेसोबत काम केलं पाहिजे. सामान्य माणसाचा भिडू कोण असेल तर बच्चू कडू असा नारा तयार झालाय. विचारातून संघटना मोठी केलीय असंही बच्चू कडू म्हणाले
No comments:
Post a Comment