Tuesday, April 28, 2026

कराडच्या मंगळवार पेठ परिसरातील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात श्री नृसिंह जन्मोत्सवानिमित्त... गुरुवार, दि. ३० एप्रिल २०२६ रोजी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ; मोठ्या संख्येने उपस्थित रहा ; आयोजकांचे भाविकांना आवाहन ;

वेध माझा ऑनलाईन
कराड  येथील मंगळवार पेठ परिसरातील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात श्री नृसिंह जन्मोत्सवानिमित्त गुरुवार, दि. ३० एप्रिल २०२६ रोजी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

सकाळी ६.३० ते ७.०० – पवमानसूक्त तसेच पंचसूक्त अभिषेक (नारायण सूक्त, विष्णू सूक्त, पुरुष सूक्त, श्री सूक्त व आमभृणी सूक्त) वेदशास्त्र संपन्न वरद वामन कुलकर्णी गुरुजी व मल्हारी उमराणी गुरुजी यांच्या उपस्थितीत

सकाळी ७.३० ते ८.०० – विष्णुसहस्रनाम पठण
सकाळी ८.३० ते ९.०० – वेदशास्त्र 
पाठशाळेच्या वतीने मंत्रजागर
सकाळी ९.३० ते १०.०० – श्री नृसिंह बीज मंत्र जागर

सायंकाळी ४.०० ते ५.०० – शारदा भजनी मंडळ, कऱ्हाड यांचा भजन कार्यक्रम
सायंकाळी ५.३० ते ७.०० – सुप्रसिद्ध ह.भ.प. श्री. पित्रे गुरुजी, कासेगाव (ता. वाळवा, जि. सांगली) यांचे सुमधुर कीर्तन (साथ: श्री ब्रह्मचैतन्य भजनी मंडळ, कऱ्हाड)

सायंकाळी ७.०० ते ७.३० – श्री नृसिंह जन्मकाळ सोहळा
रात्री ८.०० ते ८.३० – हळदीकुंकू व तीर्थप्रसाद
रात्री ९.०० ते ९.३० – विष्णुसहस्रनाम मंत्रजागर

ज्या भाविकांना श्रीस अभिषेक करावयाचा आहे त्यांनी शनिवार, दिनांक २९ एप्रिल २०२६ पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर, प्रेमलाताई चव्हाण पॉलिटेक्निक जवळ, संत सखु मंदिराचे पुढीलबाजूस, मंगळवार पेठ, कऱ्हाड येथे करण्यात आले असून ॲड. विराग अरुण जांभळे यांचे वतीने धार्मिक कार्यांत सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क: मो. ९४२२६०३३९१ / ८६६८६७००९.

No comments:

Post a Comment