Monday, October 19, 2026

सातारा Dcc बँकेच्या रिंगणातून रामराजेंचे उमेदवारी अर्ज मागे ; तरीही निवडणूक होणार रंगतदार ! ;

वेध माझा ऑनलाइन।
सातारा Dcc बँकेच्या निवडणुकीतुन विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांनी फलटण तालुका सोसायटी आणि कृषी प्रक्रिया या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारी अर्ज आज मागे घेतले. आरबीआयच्या निकषानुसार सलग दहा वर्षांहून अधिक काळ संचालक राहिलेल्या नेत्यांवर अपात्रतेची तलवार लटकत आहे.त्यामुळे रामराजेंनी निवडणुकीतूनच माघार घेतली आहे अशी चर्चा आहे बुधवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे 

दरम्यान 
रामराजेंनी निवडणुकीतून माघार घेतली असली तरी सोसायटी आणि कृषी प्रक्रिया मतदारसंघात बाकीच्या उमेदवारांचे अर्ज रिंगणात असल्याने निवडणूक रंगतदार होणार आहे.
रामराजे निंबाळकर यांनी फलटण सोसायटी तसेच कृषी प्रक्रिया मतदारसंघातून आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. 

No comments:

Post a Comment