Monday, October 19, 2026

कृष्णा सहकारी बँकेच्या नवीन मुख्यालयाचे उद्या भूमिपूजन ; डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते समारंभ; आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांची प्रमुख उपस्थिती ;

वेध माझा ऑनलाईन।
कृष्णा सहकारी बँक लि., रेठरे बुद्रुकच्या नवीन वास्तूच्या उभारणीचा शुभारंभ उद्या, मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी होणार आहे. पुणे-बंगळूर महामार्गालगत मलकापूर, कराड येथे सकाळी ११.३० वाजता या नवीन मुख्य कार्यालयाच्या भूमिपूजन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

कृष्णा सहकारी बँकेच्या या नवीन वास्तूचे भूमिपूजन कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले (बाबा) यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. बँकेच्या मुख्य कार्यालयासाठी उभारण्यात येणारी ही नवीन वास्तू मलकापूर येथील पुणे-बंगळूर महामार्गालगत, हॉटेल साईप्रार्थनासमोर, एन.पी. मोटर्सजवळ उभारण्यात येणार आहे. आधुनिक सुविधांनी युक्त अशा या वास्तूमुळे बँकेच्या प्रशासकीय कामकाजाला नवी दिशा मिळणार आहे.

या भूमिपूजन समारंभास बँकेचे सर्व संचालक, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, अधिकारी, कर्मचारी तसेच सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान जाधव आणि उपाध्यक्ष दामाजी मोरे (भाऊ) यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment