वेध माझा ऑनलाइन। ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा धमकी आली आहे. यापूर्वी धमकीचे फोन आल्यानंतर आता पत्र आले आहे. या पत्रात छगन भुजबळ यांच्या हत्येसाठी एक बैठक झाल्याचा उल्लेख आहे. या बैठकीला पाच जण उपस्थित होते. ही बैठक कुठे झाली, याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तसेच पोलिसांना हे पत्र दिले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ही धमकी आल्याच्या प्रश्नावर बोलण्यास भुजबळ यांनी नकार दिला.
काय म्हणाले भुजबळ
मंत्री छगन भुजबळ यांना धमकीचे पत्र आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आतापर्यंत फोन आणि मेसेज तर खूप आले. परंतु आता पत्रही आले आहे. आयुष्यात असे अनेक प्रसंग आले आहेत. परंतु काहीही झाले तरी मी माझी भूमिका, माझी आयडॉलॉजी सोडणार नाही. मी घरी बसू शकत नाही. जे परिणाम होतील, त्यासाठी आपली तयारी आहे. आता पोलिसांवर सर्व सोडून दिले आहे. पोलीस शोध घेतील.
काय आहे पत्रात
भुजबळ यांना धमकीचे पत्र आले आहे. त्यात काही नंबर पण देण्यात आले आहेत. काही गाड्यांचे नंबरही दिले आहे. तसेच ज्या हॉटेलसमोर मीटिंग झाली, त्या हॉटेलचे देखील नाव आहे. हत्येच्या कटासाठी पाच लोकांची बैठक झाली. ही बैठक ज्या हॉटेलसमोर झाली त्याची माहिती आहे. आता हा प्रकार पोलिसांवर सोपवून द्यायचे आहे. धमकी आली तरी घरी बसू शकत नाही, जे परिणाम व्हायचे ते होतील. मी माझी भूमिका सोडू शकत नाही. पोलिसांना माहिती दिलीय, ते काय करायचं करतील
No comments:
Post a Comment