वेध माझा ऑनलाईन। शरद पवार साहेबांनी अजित दादांवर मुलासारखं प्रेम केलं. त्यांच्यावर अन्याय झाला असा आम्हाला कोणालाही वाटत नाही, पण त्यांनीच कुटुंबाला एकटं पाडलं आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे तरूण नेते रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर मोठा आरोप केला आहे. अहमदनगरमध्ये बोलताना त्यांना अजित पवार यांना खडेबोल सुनावले. काही दिवसांपूर्वी बारामतीमधील मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी तेथील जनतेला भावनिक आवाहन केले. बारामतीमध्ये एकटं पाडलं जातंय असं विधान त्यांनी केलं होतं. त्याच विधानाचा समाचार घेताना रोहित पवार यांनी अजित पवार यांना चोख प्रत्युत्तर दिलं.
योगेंद्र पवार यांनी जी भूमिका घेतली ती शरद पवार साहेबांच्या बाजूची घेतली. कारण आम्हा सर्वांना माहिती आहे दादावर साहेबांनी मुलासारखं प्रेम केलं. जी जी मोठी संधी समोर आली ती कुटुंबातील इतर कोणालाही मिळाली नाही, तर दादांना मिळाली. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला असा आम्हाला कोणालाही वाटत नाही. उलट अजित पवार यांनीच कुटुंबाला एकटं पाडलं, असा आरोप रोहित पवार यांनी केला. आणि ते त्यांच्यासोबत (भाजप) गेले. अजित पवारांनी कुटुंबाला एकट पाडून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तो कुटुंबाला आवडला नाही. जय आणि योगेंद्र पवार देखील बोलले की दादांना एकटं पाडलं नाही. मग आता दादा असं का म्हणत आहेत की त्यांना एकटं पाडलं ? अशा शब्दात रोहित पवारांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं.
No comments:
Post a Comment